देशांतर्गत विमान प्रवासाचे भाडे ३० टक्क्यांनी वाढले ,३१ मार्चपर्यंत ८०% क्षमतेसह विमानांचे उड्डाण सुरू 

0
36

सरकारने वेगवेगळ्या रुटसाठी निश्चित केलेले विमान भाडे वाढवले आहे .यामुळे देशांतर्गत हवाई प्रवासासाठी आता 30% जास्त खर्च करावे लागतील. यासोबतच एअरलाइन कंपन्यांवर प्री-कोविड लेव्हलच्या तुलनेत जास्तीत जास्त 80% क्षमतेसोबत फ्लाइट ऑपरेट करण्यासाठी लावण्यात आलेली मर्यादा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली.किमान भाड्यांमध्ये 10% अन जास्तीत जास्त भाड्यामध्ये 30% वाढ झाली.

नवीन प्राइस बँडनुसार, दिल्ली-मुंबई मार्गावरील इकॉनॉमी क्लासमधील एकेरी भाडे आता 3,900 ते 13,000 रुपयांपर्यंत असेल. यापूर्वी हे 3,500-10,000 रुपयांच्या जवळपास होते. यामध्ये विमानतळाचा यूजर डेव्हलपमेंट शुल्क, प्रवासी सुरक्षा शुल्क (देशांतर्गत मार्गावरील 150 रुपये) आणि GST चा समावेश नाही.