डॉनल्ड ट्रम्प दुसऱ्या महाभियोग खटल्यात सुटले निर्दोष

0
96

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना त्यांच्या दुसर्‍या महाभियोग खटल्यात निर्दोष सोडण्यात आले आहे. कॅपिटल हिलमध्ये 6 जानेवारी रोजी झालेल्या महाभियोग प्रक्रियेमुळे सिनेटमध्ये मतदान झाले आणि त्यामध्ये 57 सिनेटर्सने त्यांना दोषी ठरविले तर 43 सिनेटर्सनी त्यांना दोषी ठरवले नाही. अशा परिस्थितीत ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी सिनेटला दोन तृतीयांश बहुमत मिळू शकले नाही. तत्पूर्वी, 13 फेब्रुवारी रोजी, सिनेटने ट्रम्प यांच्याविरूद्ध दुसर्‍या वेळी आणलेल्या महाभियोग प्रस्तावावर सुनावणीनंतर मतदान पूर्ण केले होते.