डॉनल्ड ट्रम्प यांच्या विरोधात दुसऱ्यांदा महाभियोगची कारवाई सुरु

0
42

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डॉनल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सीनेटमध्ये मंगळवारपासून महाभियोग चालवण्यासाठी ट्रायल सुरु झाला आहे. भारतीय वेळेनुसार कारवाई रात्री 11:30 वाजेपासून सुरु झाली आहे. अमेरिकेच्या लोकशाहीमध्ये 231 वर्षांच्या इतिहासात ही पहिली वेळ आहे की, एखाद्या राष्ट्रपतीला दुसऱ्या वेळेस महाभियोग प्रक्रियेचा सामना करावा लागत आहे. महाभियोगवरील सुनवाईसाठी डेमोक्रेटीक पक्षाला सीनेटमध्ये दोन तृतीयांश मतांची गरज असणार. सध्या 100 जागांच्या सिनेटमध्ये डेमोक्रेटीक आणि रिपब्लिकन या पक्षांचे 50-50 सदस्य आहेत.