रंगमंच कामगारांवर उपासमारीचे संकट

0
25

नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची मर्यादा आणि पुन्हा उभं राहिलेले लॉकडाऊनचं संकट यामुळे रंगमंच कलाकारांना भविष्याची चिंता सतावत आहे. प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, संगीत संयोजक इत्यादी रंगमंच कामगार गेली अनेक वर्षे रंगभूमीची सेवा करत आहेत. कोरोनामुळे सध्या ठराविक नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर सुरु आहेत. लॉकडाऊनमधील बंधनं शिथील केल्यानंतर नाट्यगृहं सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मर्यादीत प्रेक्षक संख्येत काही नामवंत कलाकारांची नाटकं सुरु आहेत. मात्र आर्थिक अडचण, प्रेक्षक न येण्याची भिती यामुले प्रायोगिक नाटकांचे प्रयोग सुरु झालेले नाहीत. त्यामुळे या नाटकांवर अवलंबून असलेल्या रंगमंच कामगारांवर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.