भारतात मेट्रो मॅन म्हणून ख्याती असलेले ई श्रीधरन भाजपात सहभागी होणार

0
26

भारतात मेट्रो मॅन म्हणून ख्याती असलेले ई श्रीधरन भाजपात सहभागी होणार आहेत. 21 फेब्रुवारीला केरळ भाजपा प्रमुख के सुरेंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली विजय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा श्रीधरन भाजपाचं सदस्यत्व स्वीकारणार आहेत.

दिल्लीत मेट्रोचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रीधरन यांची महत्त्वाची भूमिका आहे. दिल्ली मेट्रो व्यतिरिक्त कोलकाता मेट्रो, कोच्चि मेट्रोसह देशभरातील मेट्रो प्रोजेक्टमध्ये श्रीधरन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. श्रीधरन यांना भारत सरकारने पद्म विभूषण, पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.