लॉयेल्टी बेटावर 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

0
41

दक्षिण पॅसिफिक समुद्रात मोठ्या तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी मोजली गेली आहे. लॉयल्टी बेटांवर या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी भीषण आहे. या भूकंपाचे हादरे न्यूझीलंडपासून इंडोनेशियापर्यंत जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू लॉयल्टी बेटांजवळ जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येते आहे. समुद्र किनाऱ्यावर सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमेरिकेच्या त्सुनामी केंद्राने वानूआतू आणि फिजीमध्ये 3.0 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.