प्रसिद्ध व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड

0
25

पुणे: पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली. ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता अविनाश भोसले यांच्या एबीआयएल कार्यालयात पोहोचले. ईडीकडून अविनाश भोसले यांची चौकशी सुरु आहे. अविनाश भोसले यांची याआधी नोव्हेंबर महिन्यात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम तसेच हॉटेल व्यवसायिक आहेत.यासह मुंबईतील २३ ठिकाणांवर धाड टाकण्यात आली होती.