विवा समूहाची 34 कोटींची मालमत्ता जप्त

0
43

मुंबई: पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी विवा समूहाची 34 कोटी 36 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. बँकेतून कर्ज घेऊन गैरव्यवहार केल्याने विवा ग्रुप ईडीच्या रडारवर आहे.

एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवान यांनी अंधेरीतील बेकायदा मालमत्ता विवा समूहाकडे वळवल्या होत्या. त्यामध्ये दोन कार्यालयांचा समावेश होता. त्यांची किंमत 34 कोटी 36 लाख रुपये इतकी आहे. या दोन्ही मालमत्तांची कागदोपत्री 34 लाख 36 हजार इतकी किंमत दाखवण्यात आली आहे. विवा समुहाने मॅक स्टारला या व्यवहारासाठी 37 चेक दिल्याचे समोर आले आहे. एचडीआयएल, मॅक स्टार आणि विवा समूहाचे संगनमत असल्याचे ईडी तपासात निष्पन्न झाले. त्यावरून ईडीने ही कारवाई केली आहे.