तपोवनमधील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

0
53

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळल्यानं मोठं नुकसान झालं असून नद्यांवरील प्रकल्पांवर काम करत असलेले मजूरही पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले आहेत. तपोवन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आयटीबीपी आणि इतर यंत्रणा मोठे प्रयत्न करत आहेत. बोगद्यात खोदकाम सुरु असून कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत 34 लोकांचे शव हाती लागले असून अजून 170 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.