एकनाथ खडसेंना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण?

0
192

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी खडसेंना दोनदा कोरोना सदृश्य लक्षणं आणि लागण झाल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ खडसे यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान कोरोनाची चाचणी जरी पॉझिटिव्ह आली असली तरी तब्येत बरी असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. संपर्कात आलेल्यानी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

याआधी 19 नोव्हेंबरला कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. तेव्हाही त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. 31 डिसेंबरला कोरोना सदृश्य लक्षणं आढळल्याने डॉक्टरांनी 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. ही माहितीही त्यांनी ट्विटद्वारे दिली होती.