पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आज निवडणूक आयोगाचं मंथन

0
27

पाच राज्यांमध्ये यावर्षी निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडु आणि पुडुचेरी विधानसभेसाठी निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर दोन दिवसात निवडणूक आयोग तारखांची घोषणा करेल अशी शक्यता आहे. एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये पोलीस आणि सीआरपीएफच्या तैनातीवरही चर्चा होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 6,400 पोलिंग बूथ संवेदनशील आहेत. यासाठी गुरुवारी उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत.