ग्राहकांना वीजदरवाढीचा बसणार पुन्हा फटका

0
23

येणा-या या २ वर्षात राज्यातील सर्व वीज ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसणार आहे. तसेच २०२२ च्या एप्रिलनंतर महावितरण फेरआढावा याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे २०२३-२५ या २ वर्षांत राज्यातील सर्वाना पुन्हा दरवाढीचा फटका बसणार हे निश्चितच आहे, असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले.

देशात घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि शेती पंप या वर्गांचे वीजदर सर्वात जास्त आहेत. तसेच वीजदर स्पर्धात्मक पातळीवर आणण्यासाठी वीज गळती व वीज खरेदी खर्च कमी करणे आवश्यक आहे, असेही होगाडे यांनी सांगितले.