1 एप्रिलपासून वीज दोन टक्क्यांनी स्वस्त होणार

0
24

राज्यातील वीजग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वीज नियामक मंडळाने वीजदर 2 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियामक आयोगाने एफएसी फंडाच्या माध्यमातून वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत. 1 एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मार्च 2020 मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च 20 ते मार्च 21 पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी 10 टक्के वीजदर कमी करण्यात आले.