पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत संपूर्ण इंग्लंड संघाला 134 धावांवर रोखले. गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे आता भारताकडे 195 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशीच भारतीय संघाने संपूर्ण इंग्लंड संघ तंबूत पाठवला. आता दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी भारताकडे आहे. फिरकीपटू आर. अश्विनने चांगली कामगिरी करत 5 गडी टिपले. इशांत शर्मा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन गडी, तर सिराजने एक गडी बाद केला.