टी ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या 4 गडी बाद 84 धावा

0
33

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाचे चहापानापर्यंत 4 गडी झटपट बाद झाले. चहापानाची वेळ झाली तेव्हा इंग्लंडने 4 गडी गमवून 84 धावा केल्या होत्या. जॅक क्रॅवले 53, जो रूट 17, तर सिबले आणि बेअरस्टो हे शून्यावर बाद झाले. भारताकडून अक्षर पटेलने 2, तर इशांत शर्मा आणि आर. अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडला आयसीसी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे. तर भारताला एक सामना ड्रा आणि एक जिंकावा लागेल. अन्यथा ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळेल.