पहिल्या कसोटीवर इंग्लंडचे राज्य, मालिकेत 1-0ने आघाडी

0
80
source- england cricket twitter handle
source- england cricket twitter handle

भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाने कसोटी मालिकेतील पहिला सामना आपल्या खिशात टाकला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीवर भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसऱ्या डावात आर. अश्विनने गोलंदाजीत कमाल दाखवत 6 गडी बाद करत भारताला आशेचा किरण दाखवला होता. भारतासमोर विजयासाठी 420 धावा आवश्यक होत्या. मात्र एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. संपूर्ण भारतीय संघ 192 या धावसंख्येवर बाद झाला. भारताकडून शुभमन गिलने 50 तर कर्णधार विराट कोहलीने 72 धावा केल्या. रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करु शकले नाहीत. इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केल्यानंतर मायदेशातील पहिल्या कसोटी सामन्यात क्रीकेट रसिकांना टीम इंडियाने निराश केले.