नवी मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना

0
46


नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि निवडणूक व्यवस्थापन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. या समितीत नसीम खान यांच्याबरोबर प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप आणि शरद अहेर हे या समितीचे सदस्य आहेत.