भ्रष्टाचार प्रकरणात फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष दोषी; एक वर्षाची कैद

0
23

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी यांच्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने एक वर्षांची कैद आणि दोन वर्षांसाठी निलंबणाची कारवाई केली आहे. सरकोजी यांच्या दोन वकीलांना देखील या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं गेलं आहे. तसेच त्यांना देखील सरकोजी यांच्याच प्रमाणे शिक्षा सुनावली गेली आहे. निकोलस सरकोजी 2007 पासून 2012 पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. सरकोजी यांनी 2014 मधील एका प्रकरणामध्ये मॅजिस्ट्रेटवर आपल्या पदाचा दुरुपयोग करुन प्रभाव टाकला होता. खासगी हेतूसाठी त्यांनी हा प्रभाव टाकल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणातील ते एक प्रमुख आरोपी आहेत.