फडणवीस-नाना पटोले यांच्यात कलगीतुरा रंगला

0
75

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. नाना पटोले यांनी पेट्रोल दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. आता मूग गिळून गप्प असल्याची बोचरी टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मोठ्या अभिनेत्यांबद्दल बोलले की प्रसिद्धी मिळते असा टोला हाणला होता. त्यावर आता नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे.

‘सत्तेत येऊन मुख्यमंत्री झालो नाही तर काय झालं? विरोधी पक्षाचा नेता तर झालो’, या नकारात्मक भूमिकेतून फडणवीस वक्तव्य करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य मनावर घेण्यासारखे नाही असा मिश्किल टोलाही लगावला. आम्ही जनतेच्या असंतोषाला वाचा फोडली असं सांगत फडणवीस यांना सुनावले.