दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसिसचा कसोटी क्रिकेटला रामराम

0
48

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने याबाबतची माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘माझे हृदय स्वच्छ आहे आणि ही वेळ एक नवा अध्याय लिहिण्यासाठी योग्य आहे’. गेल्या वर्षी याच दिवशी फाफ डुप्लेसिसने कसोटी आणि टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. फाफने आतापर्यंत एकूण 112 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यापैकी 69 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.