प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीला कोरोनाची लागण

0
42

संपूर्ण जगात या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेकांनी आपले जीव देखील  गमावले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काही दिवसापूर्वी अभिनेता रणबीर कपूर तसेच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. त्यातच आता प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी यांना देखील आज कोरोनाची लागण झाली आहे. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

“माझी तब्येत स्थिर आहे कोणीही काळजी करु नये”, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली आहे. तसेच योग्य ती काळजी घ्या”, असा सल्ला देखील चाहत्यांना दिला आहे.