प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचे निधन

0
59

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे मात्र गेले अनेक दिवसंपासून ते दवाखान्यात दाखल होते.त्यांना मूत्रपिंडाची समस्या असल्याने गेल्या ३० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

काही दिवसांपूर्वीच त्यांचे मूत्रपिंडाचे ऑपरेशन यशस्वी पार पडले होते यामध्येच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. सरदुल सिकंदर यांनी अनेक पंजाबी हिट गाणी गायली आहेत. त्याचा पहिला अल्बम 1980 मध्ये आला होता. ‘रोडवेज द लारी’ असे या अल्बमचे नाव होते. यानंतर, त्यांनी बरेच अल्बम काढले आणि मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या निधनाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Photo: zareen khan