मिथिला पालकरच्या या लुकमुळे चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ

0
35

अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या सोशल मिडीयावर देखील नेहमी फोटो तसेच व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. असाच एक व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने आपल्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्यात तिने गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. तसेच त्यात ती खुलून दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांहून जास्त लोकांनी लाईक केले आहे. मिथिला पालकरने खूप कमी वेळेत चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.

नुकतीच ती ‘त्रिभंगा’ या रेणूका शहाणे यांच्या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते.