आजपासून वाहन चालकांसाठी फास्टॅग बंधनकारक

0
126

आजपासून वाहन चालकांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. फास्टॅग नसल्यास वाहन चालकांना रोख रक्कम भरताना दुपटीने टोल द्यावा लागणार आहे. 1 जानेवारीपासूनच फास्टॅग लागू करण्यात येणार होता मात्र लोकांपर्यंत माहितीचा आणि जनजागृतीचा अभाव यामुळेच फास्टॅग प्रणाली लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता शासनाने सर्वांना फास्टॅग अनिवार्य केला आहे.