डोंबिवली: रुनवाल माय सिटी प्रोजेक्टच्या कामगार वसाहतीला भीषण आग

0
60

डोंबिवलीच्या रुनवाल माय सिटी प्रोजेक्टच्या लेबर कॅम्प वसाहतिच्या फेज २ ला आज सकाळी ०६:५० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. सदर घटनास्थळी कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे २-फायर वाहन रवाना झाले होते. सदरची आग आज सकाळी १०:१० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, सदर घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि एक व्यक्ती जखमी झालेली असून त्यांना उपचारासाठी नेपच्यून हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती कल्याण-डोंबिवली अ. केंद्रातून मिळाली