वर्ध्यातील गोल बाजार परिसरात भीषण आग 

0
29


वर्धा: शहरात गोल बाजार हा गर्दीचा परिसर असतो .या रस्त्यावर नेहेमी दरवळ बघायला मिळते. याच भागात आज सकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही मात्र थोड्याच वेळात या आगीने रौद्र रूप घेतल्याची माहिती समोर येतीये. तसेच आगीत जवळपास 10 ते15 भाजी विक्रेत्यांची दुकाने जळून खाक झाले असून यामध्ये भाजीपाला, फळ विक्रीचे साहित्य आणि दुकाने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचा प्रयत्न केल्या जातोय.बाजाराच्या मुख्य परिसरात अचानक आग लागल्याने खळबळ व्यक्त केली जात असून परिसरात नागरिकांची गर्दी जमली .घटनास्थळी पोलिसांसह, अग्निशामक दल दाखल झालेले असून लवकरच आगीवर नियंत्रण केले जाईल.