वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या 500 जणांविरोधात गुन्हा दाखल

0
36

डोंबिवली येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र येऊन कोविड -19च्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सुमारे 500 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) यांनी गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डेस्लेपाडा येथे 17 आणि 18 फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्री वाढदिवस आयोजित करण्यात आला होता. या वाढदिवसाबद्दल तक्रार करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय. तक्रारीत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगण्यात आलं होतं. मास्क न घालणे तसेच सोशल डिस्टनसिंगचं पालन न करणे अशा तक्रारी तक्रारदाराने केल्या होत्या.
इशारा देण्यात आल्यानंतर नागरी अधिकाऱ्यांनी परिसराला भेट दिली आणि नंतर यजमान व उपस्थितांसह सुमारे 500 लोकांविरूद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे निवेदनात म्हटले आहे.