इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स मिळवणारा पहिला क्रिकेटपटू कोण ते जाणून घ्या,

0
46
ENGLAND TWITTER HANDLE
ENGLAND TWITTER HANDLE

भारताचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच आतापर्यंत त्याने क्रिकेटक्षेत्रात आपल्या कामगिरीने अनेक रेकॉर्ड केले आहेतच, परंतू आता सोशल मीडियावर देखील कोहलीने रेकॉर्ड केला आहे. इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स मिळविणारा विराट कोहली जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

तसेच या कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने देखील विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे. विराट कोहली सतत इन्स्टाग्रामवर सक्रिय असतो. तसेच त्याच्या इंस्टाग्रामवर तो अनेक उत्तम व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. काही दिवसापूर्वीच विरुष्काने एका मुलीला जन्म दिल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.