कल्याणमधील माजी नगरसेवक कुणाल पाटलांविरोधात अपहरणाचा गुन्हा

0
34

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह आठ जणांविरोधात अपहरण करुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालक सुमित सिंग याच्या तक्रारीनंतर हा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कुणाल पाटील यांचे कार्यकर्ते सुमितचं अपहरण करुन त्यांच्याकडे घेऊन गेल्याचे आरोप करण्यात आला आहे. सुमितने राजन दुबे या व्यक्तिकडून 30 हजार रुपये उसनवारीवर घेतले होते. मात्र काही पैसे तो वेळेवर परत करु शकला नाही. ते पैसे परत करण्यासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी दबाव टाकला. तसेच राजन दुबे याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी सुमित याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

दूसरीकडे कुणाल पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सुमितने घडलेल्या प्रकाराची तारीख 19 फेब्रुवारी सांगितली आहे. मात्र त्या दिवशी कुणाल पाटील न्यायालयीन कामासाठी दिल्लीत गेले होते. त्यामुळे कुणाल पाटील डोंबिवलीत अपहरण कसं करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.