कंटेनरला भीषण आग, महागड्या गाड्या जळून खाक

0
39

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली आहे. ही घटना मनोर येथील चिल्लार फाट्याजवळ घडली.हा कंटेनर मुंबईतून दिल्लीकडे जात असताना अचानक प्रकारे आग लागली.या कंटेनरमध्ये अनेक महागड्या गाड्या होत्या. या आगीत कंटेनरमधील सर्व महागड्या गाड्या जळून खाक झाल्या.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर भागात कंटेनर चालकाला कंटेनरमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्परता दाखवत कंटेनर चिल्लार फाट्याजवळ सर्व्हिस रोडवर थांबवला. कंटेनर बाजूला उभा करुन पाहिले असता कंटेनरमधील आलिशान गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले.