निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

0
39

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडु, आसाम आणि पुडुचेरीमधील निवडणूक तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. आसाममध्ये निवडणूक प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार आहेत. 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील, 1 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील, तर 6 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून 2 मे ला निकाल लागणार आहे. केरळमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. 6 एप्रिलला केरळमध्ये मतदान होणार आहे. तामिळनाडुत एका टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडुत 6 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पुडुचेरीतही एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पुडुचेरीतही 6 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च, दूसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल तर आठव्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला तारखेला मतदान पार पडणार आहे. आसाममध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे. तर गेल्या आठवड्यात पुडुचेरीमधील काँग्रेस सरकार पडल्याने तिथे राष्ट्रपती शासन लागू आहे. बंगालमध्ये एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे असणार आहेत.

कोरोनाचे संकट पाहता मतदानासाठी एक तासाचा अवधी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण केले जाणार आहे. सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर निवडणूक प्रचारावेळी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवारांना ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. घरोघरी प्रचारासाठी फक्त पाच जणांना परवानगी असणार आहे.

  • पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च, दूसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल तर आठव्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला तारखेला मतदान पार पडणार आहे.
  • आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील, 1 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील, तर 6 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
  • केरळमध्ये, तामिळनाडु आणि पुडुचेरीमध्ये एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 6 एप्रिलला या तिन्ही राज्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
  • पाचही राज्यांची मतमोजणी 2 मे ला होणार आहे.