‘चीनसमोर पळ काढे’ हा भारतीय सैनिकांचा अपमान – अतुल भातखळकर

0
36

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देत असताना  राज्यातील भाजपा नेत्यांसोबतच मोदी सरकारवरही चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळेस त्यांनी शेतकरी आंदोलनाचा विषय मांडताना “शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे” असे म्हटले आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांचे हे विधान भारतीय सैनिकांचं अपमान करणार आहे, अशा आशयाच ट्वीट भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर केलं आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे राहुल गांधी झाले आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

“चीनसमोर पळ काढे असं निलाजरं विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”. जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीदेखील अतुल भातखळकर यांनी केली आहे.