इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्याला आता बिग बी अमिताभ बच्चन आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्या कलगीतुऱ्याची किनार लागली आहे. सोशल मीडियावर अँड्र्यु फ्लिंटॉफ याने अमिताभ बच्चन यांच्या पाच वर्षापूर्वीच्या ट्विटला जोरदार उत्तर दिले आहे. फ्लिंटॉफने पाच वर्षापूर्वीचे ट्विट सांभाळून ठेवले होते असेच यावरून दिसत आहे. तेव्हा बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘कोण रूट, मुळापासून उखडून देऊ रुटला?’ असे ट्विट केले होते. त्या ट्विटला फ्लिंटॉफने आता उत्तर दिले आहे.
2016 साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडला 4-0 ने पराभूत केले होते.