भाजपचे माजी नेते अन केद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश

0
37

भारतीय जनता पक्षाचे ( BJP ) माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.आज य़शवंत सिन्हा कोलकत्ता येथील तृणमूल कॉग्रेस मुख्यालयात पोहचले होते. तेथे  त्यांनी TMC मध्ये प्रवेश केला.  यशवंत सिन्हा ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी हाताळली आहे.

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सिन्हा नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.सिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा अजूनही भाजपमध्येच आहेत. झारखंडमधल्या हजारीबाग मतदारसंघाचे ते खासदार आहेत. यशवंत सिन्हा 1960मध्ये आयएएससाठी निवडले गेले. देशभरातून त्यांचा बारावा क्रमांक आला होता. आरा आणि पटणा याठिकाणी काम केल्यानंतर त्यांची संथाल परगण्यात डेप्युटी कमिशनर म्हणून नियुक्ती झाली.