माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

0
43

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे आज निधन झाले. पुण्यात वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सावंत हे 1973 रोजी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश झाले. त्यानंतर 1989 ला ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनले. 1995 साली निवृत्त झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सहभागी राहिले.