जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार – निलेश राणे

0
417

सिंधुदुर्गमधील वैभववाडीत शिवसेनेनं भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे 7 नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. नुकतेच गृहमंत्री अमित शाह हे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यानंतर भाजपाच्या या 7 नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. वाभदे-वैभववाडी नगरपंचायतीत भाजपाचं वर्चस्व होतं. 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपाकडे होते. मात्र आता 7 नगरसेवक फुटल्यानं हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाचे नगरसेवक फुटल्यानं निलेश राणे हे चांगलेच संतप्त झाले आहे, जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार. असा इशारा भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे नगरसेवक फुटीच्या बातमीवर नितेश राणे यांनीही शिवसेनेवर हास्यास्पद टीका केली आहे. व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला कधीच विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीच्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहता शिवसेनेकडे एकही मूळ शिवसैनिक सापडणार नाही. अशी खोचक टीक नितेश राणे यांनी केली आहे.