माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
35

कोलकाता: निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीच्या 76 नेत्यांनी थेट भाजप नेत्यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका बसला आहे. ममता दीदींचे विश्वासू सहकारी आणि, माजी रेल्वे मंत्री, माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. सकाळपासूनच त्रिवेदी यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्याने टीएमसीच्या तंबूत प्रचंड खळबळ उडाली होती. त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन एकट्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्रिवेदी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.