गायक सपना चौधरी विरोधात फसवणुकीचा गुन्हा

0
28
SOURCE- SAPNA CHAUDHARI FACEBOOK OFFICIAL
SOURCE- SAPNA CHAUDHARI FACEBOOK OFFICIAL

हरयाणाची प्रसिद्ध गायक सपना चौधरी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास 4 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल करण्यात आली आहे. सपना चौधरी हिने स्टेज शोसाठी पंकज चावला आणि पीआर कंपनीसोबत डान्स आणि गायनासाठी करार केला होता. त्यासाठी तिने आगाऊ रक्कम घेतली होती. मात्र स्टेज शो केलाच नाही आणि आगाऊ रक्कमही परत केली नाही. कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी सपना चौधरी विरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा सपना चौधरी हिला नोटीस पाठवणार आहे.