खंडणीप्रकरणी गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक

0
42

ठाणे: कुख्यात गुंड एजाज लकडावाला यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. कल्याणच्या एका व्यवसायिकाकडून दीड वर्षापूर्वी तब्बल दीड कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होते. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडून तपास सुरु होता. पोलिसांनी एजाज लकडावाला याला अटक केली असून त्याला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एजाज लकडावाला हा दहशतवादी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार आहे. त्याच्यावर खंडणी, हत्या, फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.