स्केटिंग करताना पडली जेनेलिया, पाहा व्हिडीओ

0
40

सध्या जेनेलिया डिसुजा चित्रपटात दिसत नाही.  मात्र ती आणि रितेश देशमुख  सध्या सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असत्तात. ते नेहमी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. असाच एक व्हिडीओ काही वेळापूर्वी जेनेलियाने स्वत: हा शेअर केला आहे. यात जेनेलिया स्केटिंग करताना दिसते आणि स्केटिंग करताना ती धडकन् पडली. पडल्यामुळे जेनेलियाच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यातही तिने ‘मेरी रिकव्हरी पावरी स्टोरी’ अस म्हणत एक फनी व्हिडीओ शेअर केलाय.

काही आठवड्यांपूर्वी मी स्केटिंग शिकण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यामध्ये मी अपयशी ठरले परंतु, अनेकदा उंच भरारी घेण्याआधी तुम्ही अगोदर धडपडता त्यानंतर यश मिळते, आशा करते, पुन्हा पडणार नाही.’ असा संदेश देखील तिने लिहिला आहे. तसेच जेनेलिया व रितेश दोघेही सध्या सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत