भाजपला दे धक्का! संजय साडेगावकरांसह ५५ जणांनी धरला शिवसेनेचा झेंडा

0
35

भाजप नेते संजय साडेगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत आहेत. संजय साडेगावकर हे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे मोठे पदाधिकारी आहेत. यामध्ये राठोड यांच्यासह जिल्ह्यातील 50 ते 55 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
परभणी शहरात शिवसेनेच्या प्रवेश सोहळ्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयासमोरील जागेत पेंडॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.