थेट मळ्यात जाऊन केली प्रियांका गांधींनी चहाच्या पानांची तोडणी

0
44

सध्या आसाममधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी – वाड्रा या सोमवारपासून दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मंगळवारी त्यांनी सधारु टी स्टेट येथे भेट दिले असून त्यांनी यावेळी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चहाच्या पानांची तोडणी केली.

प्रियंका यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. आसाममध्ये १२६ सदस्यांची विधानसभा असून येथे २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.