गोल्फर टायगर वूड्स रस्ते अपघातात जखमी

0
71
SOURCE- TIGER WOODS TWITTER HANDLE
SOURCE- TIGER WOODS TWITTER HANDLE

गोल्फर टायगर वूड्सच्या गाडीला मंगळवारी लॉस एंजिल्समध्ये अपघात झाला. या अपघातात टायगर वूड्स जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या अपघातात वूड्सच्या पायाला जबर मार लागला आहे. वूड्स स्वत: गाडी चालवत असल्याचे माहिती मिळत आहे. गाडीचा वेग अधिक होता. त्याचबरोबर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडर धडकली. या अपघातात वूड्स हे जखमी झालेत.

टायगर वूड्स यांनी आतापर्यंत 15 गोल्फ चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. या अपघातानंतर त्यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 2019 साली त्यांनी शेवटची चॅम्पियनशिप जिंकली होती.