मुंबईसह कोकणातील महिलांसाठी चांगली बातमी

0
35

जागतिक महिलादिनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास, कोकण विभागाच्या विभागीय उप-आयुक्तांनी दिली आहे. तसेच हा उद्घाटनाचा कार्यक्रम राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटी यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यालयाच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सातही जिल्ह्यांमध्ये महिलांच्या तक्रारीचे निवारण करता यावे असा प्रयत्न असेल. त्यानुसार महिलांना त्यांच्या इच्छेनुसार समुपदेशन केले जाईल तसेच त्यांच्या स्थानिक पोलीस स्टेशनकडून सहकार्य देण्यात येईल. आयोगाच्या विभागीय कार्यालयाद्वारे प्रस्तावित, नियोजित सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील.

त्यानुसार हे कोकण विभागीय कार्यालय विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण विभाग, सदनिका नं.05/06, शांती बिल्डींग, बी- विंग, विश्वधन को-ऑप. हौ. सोसा. लिमिटेड, सर्वोदय पार्श्वनाथनगर, जैन मंदीर रोड, मुलूंड (पश्चिम), मुंबई-400080 अशी माहिती महिला व बालविकास, कोकण विभागाच्या विभागीय उप-आयुक्तांनी दिली आहे.