वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर 

0
38

राज्यात गेल्या काही दिवसांपासून टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे.या प्रकरणात वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत होत्या ज्यामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले होते.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्यानंतर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला होता .तो राजीनामा आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्या खात्याचा कार्यभार स्वतःकडे देण्याची विनंती केली होती या विनंतीवर विचार करत भगत सिंग कोशारी यांनी राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे.मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.त्यावर लगेच ही कारवाई करण्यात आली आहे.