विधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल-सरकार आमनेसामने

0
34
SOURCE-BHAGAT SINGH KOSHYARI TWITTER
SOURCE-BHAGAT SINGH KOSHYARI TWITTER

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदावरुन पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यपालांनी अर्थसंकल्पापूर्वी विधानसभा अध्यक्षाची निवड करण्याची सूचना दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. मात्र महाविकास आघाडीत या पदावरून सध्या जोरदार कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. त्यात राज्यपालांनी सूचना केल्याने महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा सामना सुरु झाला आहे. दूसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी सर्वप्रथम 12 आमदारांची नियुक्ती करावी असा सल्ला राज्यपालांना दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध सरकार असा सामना दिसणार आहे.