गुजरातच्या भरुचमधील केमिकल कंपनीत स्फोट

0
34

गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की यूपीएल-5 प्लांटला आग लागली. या स्फोटाचे आवाज 15 किलोमीटर ऐकू आले. या स्फोटात आतापर्यंत 24 जण जखमी झाले आहे. सुदैवाने अजूनपर्यंत कुणीही जखमी झालेले नाही. जखमींना भरुच आणि वडोदरातील रुग्णालयाच उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

गेल्यावर्षी जून महिन्यात भरुचमधील एका केमिकल कंपनीत असाच स्फोट झाला होता. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर 77 जण जखमी झाले होते.