गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची मतमोजणी; भाजपाची प्रतिष्ठा पणाला

0
21

गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे. गुजरातच्या सहा जिल्ह्यातील अहमदाबाद, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोटमधील 2276 उमेदवारांचे भवितव्याचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत 46.1 टक्के मतदान झाले आहे. भाजपाला पहिल्या जागेवर विजय मिळवण्यात यश आले आहे. कारण अहमदाबादच्या नारायणपुरा मतदारसंघातून त्यांच्याविरोधात कुणीही उमेदवार नव्हता. त्यामुळे ब्रिंदा सूरती यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे.