Happy Birthday Tiger Shroff :टायगर श्रॉफचं खरं नाव माहितीये? वाचा…

0
41

बॉलिवूडचा सुपरस्टार टायगर श्रॉफचा आज वाढदिवस आहे. टायगर हा जॅकी श्रॉफचा मुलगा असून त्याच्या अभिनयाने अन डान्समुळे असंख्य चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतोय.टायगर श्रॉफचा जन्म 2 मार्च 1990 साली झाला. त्याचे मूळ नाव हे हेमंत श्रॉफ असे आहे. जॅकी श्रॉफ त्याला लहानपणापासून टायगर या नावाने बोलवायचा. त्यामुळे त्याचे नाव पुढे टायगर असेच पडले.तायकांदोमध्ये टायगर श्रॉफन निपूण मिळवले असून त्याने यामध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.

टायगर श्रॉफने 2004 साली हिरोपंती या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाय ठेवला.त्यानंतर बागी, ए फ्लाइंग जट्ट, बागी 2, स्टूडेन्ट ऑफ द ईयर 2 आणि वॉर या चित्रपटातून टायगर श्रॉफ प्रेक्षकांच्या भेटीला आला.वॉर या चित्रपटात टायगर श्रॉफ हा ऋतिक रोशनसोबत दिसून आला. टायगर श्रॉफ हा ऋतिक रोशनला आपला आयडॉल मानतो.टायगर श्रॉफचे नाव अभिनेत्री दिशा पटानीसोबत जोडले जात आहे. या दोघांना नेहमीच एकत्र पाहिले जाते. त्याचे असंख्य फॅन्स फोल्लोविंग आहे तसेच त्याच्या फॅशन ट्रेंडची फॅन्स नेहेमी कॉपी करत असतात