देवगडचा हापूस सांगलीच्या बाजारात दाखल

0
43

सांगली: फळांचा राजा आंबा बाजारात येण्यास फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरुवात होते. तत्पूर्वी अन्य भागातील आंबा बाजारात दाखल होतो. मात्र देवगडच्या हापूस आंब्याची ग्राहकांना खरी प्रतिक्षा लागली असते.

देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये पोहोचली असून एका डझनला 3 हजार 351 इतका विक्रमी भाव मिळाला आहे. शेतकरी अंकुश कांबळे यांच्या आंब्याला विक्रमी दर मिळाला आहे.

कोकणातील चक्रीवादळामुळे यंदा आंबा फळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी असल्याने कोकणच्या आंब्याला विक्रमी भाव मिळत आहे. पायरी आंब्याच्या एका डझनच्या बॉक्सला सुमारे 2 हजार 500 रुपये इतका भाव मिळत आहे